पथक येत असल्याचा निरोप, आणि अवैध धंदे गुंडाळण्याची धांदल….!
सावदा. ता. रावेर.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | गेल्या बारा दिवसांपूर्वी रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास बर्हाणपूर चौफुलीजवळ एचआर ५५ एक्यू ३८७३ क्रमांकाच्या कंटेनरला नाशिक येथील आयजी यांच्या अंतर्गत असलेल्या पथकाने अडवून त्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला दीड कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. आणि आता त्यातच नाशिक पोलिस उपसंचालकांचे पथक येत असल्याची माहिती मिळताच परसरतील अवैध व्यावसायिकांनी आपले आपापले व्यवसाय बंद करण्यास मोठी धावपळ केली. नाशिक उपसंचालक पोलिस पथक येत असल्या बाबत दिवसभर मोठी चर्चा होती. नक्की काय? या बाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
नाशिक पोलिस उपसंचालक येत आहेत—. नाशिक येथील पथक शुक्रवार दि. २ आगष्ट रोजी सावदा परिसरात येत असल्याचा निरोप मिळताच अवैध व्यवसाय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आणि सावदा परिसरातील अवैध व्यवसायिकांना आपला व्यवसाय गुंडाळण्यात मोठी धावपळ करत त्यांची धांदल उडाली.
सावदा शहर व परिसरासह सावखेडा खु. सावखेडा बु. रोझोदा, खिरोदा, कोंचुर, चीनावल,मोठा वाघोदा, कुंभारखेडा, तसेच गाते, रायपूर, रणगाव, तासखेडा, थोरगव्हाण लहान वाघोदा, मस्कावद व परिसरातील आदी गावात सुरू असलेले अवैध धंदे त्यात सट्टा – मटका अवैध देशी – विदेशी दारू विक्री सह इतर काही ठिकाणी जुगार असे सर्व प्रकारचे राजरोसपणे खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद केले. मात्र हे तत्काळ बंद केलेले अवैध धंदे कायमचे बंद राहतील, की तात्पुरते बंद राहतील? असा प्रश्न परीसरात विचारला जात आहे.