फोटोत छेडछाड करून तरुणीचा अश्लील फोटो केला व्हायरल, चौघां विरोधात गुन्हा दाखल
जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l १९ वर्षीय तरुणीला धमकी देत तिचा फोटो मिळवून जामनेर तालुक्यातील चार तरुणांनी तरुणीचा फोटो एडिट करून समाज माध्यमांवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात घडली. पहूर पोलिस स्टेशनला चार तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या एका गावातील तरुणीचा फोटो यश रवींद्र शेळके, वय २१ वर्ष, नितीन सुनील पाटील, वय २६ वर्ष, सचिन सुनील सोनवणे, वय २५ वर्ष. व तनुज पाटील,वय २२ वर्ष. यांनी धमकी देऊन मिळवला. यात छेडछाड करून तो अश्लील फोटो व्हायरल केला. या प्रकरणी पहूर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भारत दाते हे करीत आहेत.