भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेर

३० ते ३५ प्रवासी असलेल्या धावत्या खासगी ट्रॅव्हलने घेतला अचानक पेट

जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पुण्याहून मध्यप्रदेशकडे बऱ्हाणपूर मार्गे धारणी कडे जात असलेल्या मध्यप्रदेशातील एक खासगी ट्रॅव्हल्स बस जळगाव जिल्ह्यात जामनेर पहूर मार्गावरून जात असताना लक्झरी बसला मंगळवारी २७ मे रोजी सकाळी ११ वाजता पाळधीजवळच्या पिंपळगाव गोलाईत गावाजवळ बसला अचानक आग लागल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली.

जामनेर पहूर रस्त्यावरून ही खाजगी ट्रॅव्हल क्र. एमपी ४८ झेडएफ ५५३३ या क्रमांकाची बस पुणे-औरंगाबाद मार्गे जात असताना पिंपळगाव गोलाईत गावाजवळ पोहोचल्यावर धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात येताच चालकाने समय सूचकता दाखवत गाडी जागीच थांबविली आणि बसमध्ये असलेले महिला, मुले, तरुण आणि काही वृद्ध व्यक्तींसह सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. चालक आणि वाहकासह सर्व प्रवासी सुरक्षित असून,

प्रवासी वेळीच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. आणि काही वेळातच बसला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशामक दलाचे बंब लागलीच घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत त्यात बस जळाली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!