भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

शाळेतील जबाबदार कर्मचाऱ्यानेच केला तब्बल १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात अनेक ठिकाणी महिला, मुली विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना आणखी एक घक्कादायक घटना अकोला शहरातून समोर आली आहे. शहरातील कौलखेड भागातल्या एका शाळेत एका कर्मचाऱ्याने तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील कौलखेड भागातल्या या शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या हेमंत चांदेकर या आरोपीने परिस्थितीचा गैरफायदा घेत इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला.

शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून परत आल्यानंतर त्या पीडित मुलींनी घडलेला सर्व प्रकार शिक्षकांना सांगितल्याने या घटनेने शिक्षकांना संताप अनावर झाला व त्यांनी कर्मचाऱ्याने केलेल्या कृत्याची माहिती शाळेच्या संचालकांना दिली. संचालकांनी या प्रकाराची तक्रार लागलीच चाईल्ड हेल्पलाइनला केली. याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपी चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!