भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रसामाजिक

धक्कादायक : मानवतेला काळीमा फासणारी घटना ; बिल न भरल्याने आईला ठेवलं ओलीस, बाळ २१ दिवस आईच्या दुधाविना

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l असं म्हटलं जातं की, दवाखाना आणि कोर्टाची पायरी चढण्याची वेळ कोणावरही येऊ नये . अनेकदा आपल्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली असेल. पण अशी काही वेळ येते की, ही पायरी चाढविच लागते. दवाखाना म्हटलं म्हणजे किती रुपये लागतील हे सांगता येत नाही. दवाखान्याचे बिल भरण्यासाठी काही वेळा पैशांचा बंदोबस्त होत नाही, अशावेळी काही फी कमी करण्याची विनंती केली जाते. काही रुग्णालयांकडून अनेकदा विनंती मान्यदेखील होते.

चक्क आईला ठेवलं ओलीस                                        पण एका खाजगी रुग्णालयात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक तितकीच संतापजनक घटना घडली. खासगी रुग्णालयाचे बील न भरु शकल्याने त्यांनी नवजात बाळाला घरी सोडलं आणि बाळाच्या आईवा रुग्णालयातच ओलीस ठेवले. ही घटना समोर आल्यापासून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

तब्बल २१ दिवस बाळाचं बकरीच्या दुधावर संगोपन     दुध पित्या बाळाला त्याच्या आईपासून दूर करण्याची मोठी चूक रुग्णालयाने केली. नियमांच्या नावाखाली निर्दयी खासगी रुग्णालयाला माणुसकीचा विसर पडल्याचे दिसून आले. नवजात बाळासाठी दूध हे अमृतासमान असते. असे असताना त्याला दूध पिण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे त्याच्या मानवी हक्कांचे हनन आहे. यामुळे तब्बल २१ दिवस बाळाचे संगोपन बकरीचे दूध देऊन करावे लागले. ही घटना मीडियाद्वारे समोर आल्यानंतर रुग्णालयाचा भांडोफोड झाला. यानंतर रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांचा संताप अनावर झाला. शेवटी हे प्रकरण हायकोर्टात गेले आणि त्यांना यात हस्तक्षेप करावा लागला.

बील न भरल्याने जेनेटिक रुग्णालयाने आईला बाळापासून दूर करण्याचा लाजीरवाणा प्रकार केला. यानंतर कोर्टाने रुग्णालयाला नोटीस जारी केली. यासंदर्भात चौकशी करुन रिपोर्ट देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी १८ जुलै रोजी होणार आहे.

आईची रुग्णालयातून सुटका
पीडितेच्या ऑपरेशनचे ४ लाख इतके बील झाले होते. त्यांनी जमिन विकून २ लाख रुपये गोळा केले. पण शिल्लक रक्कम देण्यास त्यांच्याजवळ पैसे नव्हते. त्यांनी रुग्णालयाला त्यासंदर्भात कळवले. पण रुग्णालयाने बाळाला घरी सोडले आणि आईला ओलीस ठेवले. हे वृत्त मिळताच शेवटी पोलिसांनी २७ जून रोजी आईची रुग्णालयातून सुटका केली.

दुर्दैव आईचं दूध आटलं
पीडित मातेची सुटका झाल्यानंतर ती तिच्या घरी गेली आणि बाळाला बिलगली. बाळदेखील आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत होतं. दरम्यान आईनं बाळाला दुधासाठी जवळ घेतलं आणि तिला धक्काच बसला. तिचं दूध आटलं होतं. तिची ही धक्कादायक कहाणी आता सोशल मीडियात व्हायरल होतेय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!