भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना विशेष शिबिराचे आयोजन करून दाखले द्यावे– रोहिणी खडसेची मागणी

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : तालुक्यातील विशेष अर्थसहाय्य अंतर्गत योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी त्यांचा हयातीचा व उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी करावी लागणारी पायपीट बघता विशेष शिबिर घेऊन लाभार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता ताई संचेती यांच्या कडे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधार अर्थसाहाय्य योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना ,श्रावण बाळ सेवा योजना यांच्या अंतर्गत समाजातील वृद्ध, अपंग, विधवा परितक्ता यांना दरमहा अनुदान देण्यात येते या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी त्यांचा हयातीचा आणि नायब तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेला अत्यल्प उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो परंतु या योजनांचे लाभार्थी अपंग, निराधार वृद्ध, व्यक्ती असतात त्यांना हे दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे यावे लागते किंवा सि एस सि सेंटर मार्फत काढावे लागतात

दरम्यान, ही बाब गैरसोयीचे ठरते त्यामुळे तालुक्यात मंडळ स्तरावर कुऱ्हा, अंतुर्ली, घोडसगाव येथे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत विशेष शिबिर घेऊन लाभार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता ताई संचेती यांच्या कडे केली यावेळी तहसीलदार श्वेता ताई संचेती यांनी लवकरच मंडळ स्तरावर असे शिबीर घेण्यात येतील असे उपस्थितांना आश्वासन दिले यावेळी,डॉ बि सी महाजन, तालुका सरचिटणीस रवींद्रभाऊ दांडगे,बाळा भाऊ भालशंकर,संजय भाऊ कोळी, सुनिल भाऊ जगताप ,मयुर साठे, चेतन राजपुत, भूषण पाटीलआणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!