भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

बामणोद येथे दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू!

विरोदा , ता. यावल. मंडे टु मंडे न्युज. सतीश बऱ्हाटे| फैजपूर – भुसावळ रस्त्यावर बामणोद जवळ रईस हॉटेल समोर दोन दुचाकी ची धडक होऊन एकाचा मृत्यू झाला ही घटना दि.२ मार्च सोमवारी रात्री सुमारे साडे दहा वाजता घडली.या अपघातात विरोदा येथील श्रीराम ट्रेडिंगचे संचालक युवराज भगवान कपले. वय ४६ वर्ष. यांचा मृत्यू झाला.

युवराज कपले हे बामणोद येथून कर्णछेदनाचा कार्यक्रम आपटून परतीच्या मार्गावर असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने (avanger लाल रंग) जोरदार धडक दिल्याने यात युवराज कपले यांच्या डोक्याला जबर मार लागला व ते गंभीर झाले सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारार्थ भुसावल येथील गोल्डन अवर हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

अज्ञान दुचाकी चालक पसार व घटनास्थळावरील दुचाकी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजता हलवण्याचा प्रयत्न –

घटनास्थळावर असलेली अज्ञात व्यक्तीची दुचाकी (विना नंबर प्लेट एव्हेंजर लाल रंग ) अज्ञात व्यक्तीकडून हलवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली असून भुसावळ येथून दवाखान्यातून येत असलेल्या गावकऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी असलेल्या अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी पुढील तपासासाठी फैजपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे

होळी च्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर कपले परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. सदर घटनेने विरोदा गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!