ब्रेकिंग : आजही बस चा भीषण अपघात, उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने १ ठार, २१ प्रवाशी जखमी
धरणगाव, जि. जळगाव. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l काल दि. १३ शुक्रवार रोजी सकाळी ६ वाजता धरणगाव तालुक्यातील लाडली गावातून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशी घेऊन निघालेली बस रेल गावाहून पाडधी कडे निघालेली बस दोनगाव येथील स्मशानभूमी वळणावर बस वरील चालकाचा ताबा सुटल्याने इलेक्ट्रिक खांबावर धडकल्याने अपघात होऊन त्यात विद्यार्थी व प्रवाशी मिळून ३१ जण जखमी झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा सकाळी त्याच वेळी सकाळी ६ वाजता धरणगाव चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे फाट्याजवळ बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १ ठार तर २१ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १४ डिसेंबर शनिवार रोजी सकाळी ६ वाजता धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळील फाट्याजवळ रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०)ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात बस मधील १ जण जागीच ठार तर २१ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर बस चालकाची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच परसरतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत या भीषण अपघातात जखमी झालेल्या २१ प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.
जखमी प्रवाशांची नावे अशी,
जाकीर शब्बीर खाटीक (वय -३५, रा. पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (वय-६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय -६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय-५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय-३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय -२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय-७५, रा. पिंपळे सिम), जयश्री गणेश मराठे वय-४५, शरद बिलाडिया पारधी (वय-४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय-६५, नळयात), रमेश सोनू मराठी वय-७५, कमलबाई काशिनाथ मराठे (वय-७५), वरुड प्रवीण भगवान कुंभार (वय-२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय-३८, साळवा), सुषमा कपिल सिंग बयास (वय -३६, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (वय -७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय-३६, धरणगाव), सुनील रामसिंग अलकारी (वय -५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय-५२, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (वय-३३, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (वय-४०, जळगाव) असे प्रवासी जखमी झालेले आहेत.