सावद्याला गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला; रावेर तालुका गोवंश तस्करीचा हॉट स्पॉट
सावदा, मंडे टू मंडे न्युज : चिनावल येथे सुकी नदी पात्रात मेलेली जनावरे फेकून दिल्याची घटना ताजी असतांना आज सावदा शहरा जवळ रावेर कडून येणाऱ्या गोवंशाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आल्याने रावेर तालुका अवैध गो तस्करीचा हॉट स्पॉट बनल्याने चित्र निर्माण झाले असून पकडण्यात आलेले ट्रकमधून तब्बल 28 गुरे ताब्यात घेण्यात आली यातील 3 गुरे मयत आढळून आली तर बाकीची जखमी अवस्थेत जनावरांना गोशाळेत रवाना केले असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
रावेर कडून सावदा शहरांकडे येणारे देहराडून पासिंग असलेली गाडी क्रमांक DD 01 G 9350 या गाडीतून गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती वरून सावदा शहरा बाहेर हॉटेल महेंद्र जवळ दुपारी ४ वाजेच्या सुमारास ट्रक अडविली असता त्यातील ट्रक चालक व क्लिनर गाडी सोडून फरार झाले यावेळी गाडी उघडून बघितली असता यात सुमारे 28 गोवंश (गोऱ्हे) कोंबुन निर्दयी पणे वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या सर्व गुरांना ट्रक मधून खाली उतरविले असता निर्दयपणे कोंबल्याने अनेक जखमी तर ३ गुरे मयत झाल्याचे आढळून आले, या गुरांना जळगाव येथील बाफना गोशाळेत रवाना करण्यात आले असून ट्रक सावदा पोलीस स्टेशनला जमा करत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान मागील महिन्यात चिनावल येथे सुकी नदी पात्रात मेलेली जनावरे फेकून दिल्याची घटना ताजी असतांना आज अवैध गुरे वाहतूक करणारा ट्रक पकडला गेला, यातून रावरे तालुका हा अवैध गुरे वाहतुकीचा हॉट स्पॉट बनल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून पोलिसांन कडून यावर कठोर कार्यवाही व सखोल तपास होत नाही तोपर्यंत यास लगाम लागणार नाही
Illegal Cattle Trafficking To Ambasan 11 Cattle Rescued N