तलाठ्याला चार हजारांची लाच घेताना रंगेहात अटक, जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फेरफार नोंद व ७/१२ उताऱ्यावर नाव दाखल करून देण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या जामनेर तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. वसीम राजु तडवी (वय २७, व्यवसाय नोकरी), तलाठी सजा–जामनेर (वर्ग-३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील मुळ तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी असुन परिवारासह राहतात, तकारदार यांनी दिनांक १६/१२/२०२५ रोजी मौजे जामनेर येथील बिनशेती दोन प्लॉट कायम खरेदी केले आहे. नमुद प्लॉटची खरेदी केल्यानंतर तकारदार व त्यांची पत्नीचे फेरफार नोंद करून त्यांचे नाव अधिकार अभिलेखात तरोच ७/१२ उताऱ्यावर दाखल करण्याकरीता आरोपी लोकसेवक वसीम राजु तडवी, तलाठी, सजा जामनेर, जि. जळगाव यांनी तक्रारदार यांचेकडे ५,००० रुपयांची लाचेची मागणी केली, ग्हणुन तकारदार यांनी दि.०७/०१/ २०२६ रोजी वसीम राजु तडवी, तलाठी, जामनेर यांचेविरूद्ध ला. प्र. वि., जळगाव येथे तक्रार दिली होती,
तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीची दि. ०७/०१/२०२६ रोजी पडताळणी केली असता वसीम राजु तहवी, तलाठी यांनी तक्रारदार व त्यांची पत्नीचे नावे घेतलेल्या प्लॉटच्या फेरफार नोंद करून त्यांची नावे अधिकार अभिलेखात तसेच ७/१२ उताऱ्यावर दाखल करून देण्याचे मोबदल्यात पंच साक्षीदार यांचे समक्ष ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती ४,०००/- रूपये लाच म्हणुन स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर दि. ०७/०१/२०२६ रोजी तक्रारदार यांचे कडून
.वसीग राजु तडवी, वय २७ वर्ष, व्यवसाय नोकरी, तलाठी, सजा जामनेर (वर्ग-३), तालुका जामनेर, जिल्हा जळगाव यांनी ४,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे,
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री, योगेश ठाकुर, पोलीस उप अधीक्षक, ला, प्र, वि, जळगाव , सापळा अधिकारी हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगाव, पो. ना. / बाळु मराठे, पोशि./भुषण पाटील, नेम. ला.प्र.वि., जळगाव, यांनी केली


