लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार, दिपनगर प्रकल्पातील अभियंत्यावर गुन्हा दाखल
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l दीपनगर प्रकल्पातील अभियंत्या ने लग्नाचे अमिष दाखवित भुसावळ तालुक्यातील ३८ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच पिडीत महिलेला आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरलची धमकी देत मारहाण करण्यात आल्याची तक्रार पीडीत महिलेने केली असून पिडीत महिलेच्या तक्रारीवरून दीपनगर प्रकल्पातील एका अभियंत्या विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
हार्दिक हेमचंद्र सोनी. दीपनगर, ता. भुसावळ. या दीपनगर प्रकल्पातील अभियंत्याने दि. ५ डिसेंबर २०२१ ते दि. ६ जून ई २०२४ दरम्यान लग्न करण्याचे आमिष दाखवून पिडीत महिलेवर वेळोवेळी नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार केला तसेच पीडीतेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. अशी तक्रार भुसावळ तालुक्यातील ३८ वर्षीय पीडीतेने केली असून पीडितेच्या तक्रारीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला हार्दिक सोनी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.