जळगावयावल

यावल तालुक्यातील कामगाराचा जळगाव येथे नाल्यातील पाण्यात पडून मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील पिंपरुड येथील गणेश सदाशिव पाटील, वय ४६ वर्ष, रा. पिंपरुड, ता. यावल. याचा जळगाव येथील
एमआयडीसीतील फातीमा नगर येथील एका नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३ डिसेबर मंगळवार रोजी उघडकीला आली.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील पिंपरुड येथील रहिवाशी असलेल्या गणेश सदाशिव पाटील हे एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होतो. मंगळवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी त्याच परिसरात असलेल्या फातीमा नगरातील नाल्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले.

गणेश पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता त्यांना तेथे  मयत घोषीत करण्यात आले.. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!