विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढताना विजेचा जबर धक्का लागून अल्पवयीन तरुणाचा मृत्यू
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पतंग उडवित असताना विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करताना लोकेश सोपान पाटील. वय १५, रा. बोरखेडा ह.मु.पाळधी ता. धरणगाव. जिल्हा जळगाव.या तरुणाचा विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवार दि.२५ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान घडली.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शनिवार दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास लोकेश हा त्याच्या मित्रांसह पतंग उडवत असताना पतंग विद्युत तारांमध्ये अडकल्यामुळे त्याच्या मावशीच्या घराच्या गच्चीवर तो गेला. तेथे विद्युत तारांमध्ये अडकलेली पतंग खेचताना विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे बोरखेडा व पाळधी गावांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. इम्पेरियल स्कूल येथे इयत्ता नववीचे तो शिक्षण घेत होता. पाळधी येथे लोकेशचे वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत.