भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

वरणगाव जवळ दुचाकिंच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्रातील कामगार शनिवारी दि. २० जुलै रोजी रात्रीच्या वेळी बारा वाजे दरम्यान कामावरून घरी वरणगावकडे मोटर सायकलवरून येत असताना कपील नगर जवळ समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक जबर धडक झाली. यात तरुण ठार झाल्याची घटना घडली

दादाराव नारायण जमधाडे. वय ३६ वर्ष रा. मुळ मन्यारखेडा व ह.मु. वरणगाव,वामन गुरुजी नगर. हा तरुण दिपनगर औष्णीक विज केंद्रातील एका कंत्राटदाराकडे कामाला होता. दि. २० रोजी दुपारी ४ ते १२ वेळेत काम करून सुट्टी झाल्यानंतर रात्री घरी वरणगावकडे मोटर सायकल क्र (एमएच १९ एएच ४७९३) ने जात होता. दरम्यान त्याच बाजूने दुसरी मोटर सायकल क्र (एमएच १९ डीए ७९२६) ही भुसावळला जात असताना कपील नगरच्या समोर दोन्ही मोटर सायकली समोरासमोर जोरदार धडकल्या.
या अपघातात दादाराव जमधाडे हा जमीनीवर कोसळल्याने डोक्याला व छातीला जबर मार लागला. त्याला तत्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरानी त्याला तपासणी अंती मृत घोषित केले.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला दिपक नारायण जमधाडे यांच्या खबरी वरून भुसावळ येथील साजीद अहमद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!