यावल तालुक्यातील तरुणाची विषारी द्रव घेऊन आत्महत्या
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |३७ वर्षीय तरुणाने शुक्रवारी राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे घडली. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवासी प्रवीण राजेंद्र सपकाळे (३७) या तरुणाची पत्नी माहेरी गेली असता
तरुणाने शुक्रवारी आपल्या घरी काहीतरी विषारी द्रव प्राशन केले. आजुबाजूच्या ग्रामस्थांनी प्रवीण सपकाळे याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती यावल पोलिसांना मिळताच यावल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला . या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.