आर्थिक देवाण – घेवाणीतून तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार… जळगाव मध्ये खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आर्थिक देवाण घेवाण च्या वादातून जळगाव शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात वाद होऊन तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या पोटात चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. यात मोहित सुनील चौधरी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने जळगाव मध्ये खळबळ उडाली आहे.
मोहित सुनील चौधरी (वय २४, रा.भादली ता. जळगाव) हा तरुण भादली येथे परिवारासह राहत असून या तरुणाची धीरज प्रल्हाद पाटील (वय २३, रा. हनुमान नगर, जळगाव) याव दोघांमध्ये यापूर्वी आर्थिक देवाण-घेवाण मधून ओळख झालेली होती.
या आर्थिक देवाण – घेवाणीच्या कारणावरून बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अयोध्या नगरातील हनुमान मंदिराजवळ मोहित चौधरी हा आला असता धीरज पाटील व मोहित चौधरी या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत होऊन धीरज पाटील याने मोहित चौधरी याच्या पोटावर सपासप चाकूचे वार करून त्याला गंभीर जखमी केले.

आजूबाजूच्या लोकांनी मोहित चौधरी याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून मोहित चौधरी याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटना घडल्यानंतर लागलीच आरोपी धीरज प्रल्हाद पाटील हा स्वतःहून पोलिस स्टेशनला हजर झाला. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.