भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

सुरत मधील तरुणीवर बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाचा जळगाव मध्ये बलात्कार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील तरुणाने फूस लावून जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.

३५ वर्षीय तरुणी सुरत येथे नोकरीला असून तिला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात राहणाऱ्या विनोद शिवराम कुसळकर. वय ३५ वर्ष. याने दि. १८ मे रोजी ती जळगाव येथे आली असता दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान जळगावात रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या संदर्भात तरुणीने दि. १ जून रोजी रात्री ११. ४२ वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनुसार विनोद शिवराम कुसळकर. वय ३५ वर्ष. तालुका मेहकर, जि. बुलढाणा या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!