भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

भरधाव डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज १५ मे रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास जळगाव नशिराबाद दरम्यान रोड वरील राणे हॉटेल जवळ भरधाव वेगात आणि उलट्या दिशेने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तेजस बिऱ्हाडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

मिळालेली माहिती अशी की, गुरूवार १५ मे रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील रहिवासी तेजस युवराज बिऱ्हाडे, वय २२ वर्ष. त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे, वय १९ वर्ष. आणि त्याचा मित्र अजय सपकाळे. वय २२ वर्ष.भी तिघे दुचाकीवरून नशिराबादहून जळगावकडे जात असताना भरधाव वेगात आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात तेजस युवराज बिऱ्हाडे, वय २२ वर्ष. याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे. वय १९ वर्ष. आणि मित्र अजय सपकाळे. वय २२ वर्षे . हे दोघे गंभीर जखमी झाले. या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळावरून जखमींना उपचारासाठी शासकीय जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच तेजस आणि तुषार यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत मोठा आक्रोश केला. पोलिसांनी अपघात घडवणारा डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!