भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

अज्ञात वाहनाच्या धडकेने निंभोरा येथील तरुणाचा जागीच मृत्यू

रावेर तालुक्यातील धक्कादायक दुर्दैवी घटना

सावदा / मुंजलवाडी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. चंद्रकांत वैदकर l रावेर तालुक्यातील निंभोरा येथील तरुण कपिल अशोक वारके (माऊली मेडिकल निंभोरा) वय ३३ वर्ष. हे सावद्याहून निंभोरा येथे परत येत असताना वाघोदा येथील श्री शनी मंदिराजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत घटनास्थळावरून पोबारा केला.

धडक इतकी जबरदस्त होती की, कपिल वारके यांच्या डोक्याला मार लागून डोक्याचा काही भाग बाहेर निघाला व ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना रावेर येथे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक अशोक गर्जे व सहकारी करीत आहेत.

मयत कपिल वारके यांचा मेडिकल व्यवसाय असून गावातील प्रत्येक चांगल्या कार्यात भाग घेणारे असल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .कपिल हे निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक ए एच वारके यांचा मोठा मुलगा असून त्यांच्या पश्चात आई वडील,एक भाऊ असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!