भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकयावल

यावल तालुक्यातील तरुणाचा नाशिक येथे भीषण अपघातात मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील किनगाव येथील मूळ रहिवाशी असलेला तरुण दि.१ जानेवारी रोजी नाशिक शहरातील सातपूर जवळ कामाला असलेल्या कंपनीतून घरी परत येत असतांना कारने त्याच्या दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत अपघात होऊन तरुण गंभीर जखमी झाला होता. दोन दिवसांपासून त्याच्यावर नाशिक येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दि.४ रोजी त्याची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

यावल तालुक्यातील किनगाव अविनाश अशोक पवार (वय २२, रा. किनगाव ता. यावल) हा तरुण आपल्या मित्रांसोबत गेल्या एक महिन्यापूर्वीच नाशिक येथे एका खासगी कंपनीत कामानिमित्त गेला होता. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दि. १ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत कामावरुन घरी खोलीवर परत येत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली होती. यात मित्र व अविनाश दोन्ही जण जबर जखमी झाले होते. यात आज अविनाश पवार याचा उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाला.

या घटनेमुळे किनगाव येथे शोककळा पसरली असून त्याचे वडील वारल्यानंतर त्याच्यासह मोठ्या भावावर घराची जबाबदारी होती. त्याच्या पश्चात आई, एक अविवाहित मोठा भाऊ,असा परीवार आहे. या बाबत पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!