भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावयावल

शेअर ट्रेडिंग मध्ये अधिक नफ्याच्या आमिषा पोटी यावल तालुक्यातील तरुणाची २७ लाखांची फसवणूक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत यावल तालुक्यातील राजोरा येथील रहिवाशी चेतन विनायक नेहेते. वय ३६ वर्ष.(रा. राजोरे, ता. यावल) हे बंगळुरू येथे कंपनीत अभियंता म्हणून काम करीत असून यांची २६ लाख ७४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.


मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मूळचे यावल तालुक्यातील राजोरे येथील रहिवासी असलेले चेतन विनायक नेहेते हे बंगळुरू येथे खासगी कंपनीत अभियंता (मेंटेनन्स इंजिनिअर) आहेत. १० मार्च ते ६ जून यादरम्यान दोन जणांनी त्यांच्याशी संपर्क साधून व्हॉटस्ऑफ ग्रुप व टेलिग्रामला जॉईन होण्यास सांगितले. त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवून पोर्टलवर नोंदणी करायला लावली. त्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा विश्वास संपादन करीत ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देऊ, असे आमिष दाखविले. त्यातून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यावर २६ लाख ७४ हजार रुपये स्वीकारले.परंतु त्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. त्यांना कुठलीही रक्कम देण्यात आली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर चेतन नेहेते यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध रविवार, ९ जून रोजी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!