युक्तिवादा दरम्यात वकिलाला हृदय विकाराचा झटका, …अखेर वकिलाला वाचवता आलं नाही..
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एका वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना हृदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपुर मध्ये घडली. वकील तलत इकबाल कुरेशी नेहमीप्रमाणे सत्र न्यायालयात आले होते. आज त्यांची केस होती. मात्र युक्तिवाद सुरू असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला, विशेष म्हणजे लागलीच न्यायाधीशांनी खाली उतरून वकिलाला पाणी पाजले आणि स्वत: न्यायाधीश वकिलाला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र वकिलाला वाचवता आलं नाही.
नागपूर न्यायालयातील धक्कादायक घटना बमिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तलत इकबाल कुरेशी नागपूर जिल्हा न्यायालयात पोहोचले. सातव्या मजल्यावरील सीनियर डिव्हिजन न्यायाधीश एस.बी. पवार यांच्या न्यायालयात त्यांची केस होती. यावेळी विरोधी पक्षाचे वकील धनराजानी युक्तिवाद करीत होते, तेव्हाच कुरेशी बाकावरून खाली कोसळले. ते बेशुद्ध झाल्याचं दिसताच न्यायाधीश पवार तातडीने आपल्या जागेवरून उठले आणि कर्मचाऱ्यांना पाणी आणायला सांगून कुरेशी याना स्वतः वकिलाला पाणी पाजले. विशेष म्हणजे यानंतर न्यायाधीश पवार स्वत: आपल्या गाडीतून कुरेशी यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.