भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सुमारे २३ रस्त्यांना मंजुरी !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी: मुक्ताईनगर मतदार संघातील रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सुमारे २३ शेती रस्त्यांना मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेतून २०२२ -२३ या आर्थिक वर्षाच्या पुरवणी पुरवणी आराखड्यातून मान्यता मिळाली असून यासंदर्भातील शासन निर्णय दि.०३ जून २०२२ रोजी जाहीर झाला आहे. या रस्त्यांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार सुरू होता या प्रयत्नांना यश आले असून मतदार संघातील आणखी इतर गावातील शेती रस्त्यांची त्यांनी मागणी केलेली आहे त्या रस्त्यांना देखील लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या गावांतील शेत रस्ते झाले मंजूर :

१) वाघाडी ता. रावेर (१ किमी), २) गाते ता. रावेर (१ किमी) , ३) इच्छापुर ता. मुक्ताईनगर (२ किमी) , ४) उदळी ता.रावेर (२ किमी) , ५) ऐनपुर ता. रावेर (२ किमी) , ६) कांडवेल ता. रावेर (२ किमी) , ७) कोचुर ता. रावेर (२ किमी) , ८) कोळदा ता. रावेर (२ किमी) ,९) खामखेडा ता. मुक्ताईनगर (२ किमी), १०) गहूखेडा ता. रावेर (२ किमी), ११) गोलवाडे ता. रावेर (२ किमी) , १२) घोडसगाव ता. मुक्ताईनगर (२ किमी), १३) चांगदेव ता. मुक्ताईनगर (२ किमी) , १४) चिचखेडा बू. ता. मुक्ताईनगर (२ किमी) , १५)चिचखेडा सिम ता. बोदवड (२ किमी) ,१६) टाकळी ता. मुक्ताईनगर (२ किमी) , १७) तासखेड ता. रावेर (२ किमी) ,१८) थेरोळा ता. मुक्ताईनगर (२ किमी), १९) धामणदे ता. मुक्ताईनगर (२ किमी), २०) नाडगाव ता. बोदवड (२ किमी), २१) निमखेडी बू. ता. मुक्ताईनगर (२ किमी), २२) पुरी ता. रावेर (२ किमी), २३) आंदलवाडी ता. रावेर (२ किमी) या रस्त्याना शेत पाणंद मधून मंजुरी मिळाली असून मतदार संघातील एकूण ४६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुर्दशा पालटणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती माल वाहतूक सोयीची होणार आहे.

दरम्यान , यापूर्वी गेल्या काही महिन्यां आधी देखील १२ रस्ते ३.३० कोटींच्या निधीसह मंजूर झालेले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रत्येकी रस्त्याला 23.85 लक्ष निधी सह मंजूरी मिळाल्याने एकूण २३ रस्ते मंजूर झाल्याने सुमारे ५.४९ कोटी रु. निधी या योजनेच्या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेती रस्त्यांसाठी खेचून आणल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!