मध्यप्रदेशातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पाल येथून अटक
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गंभीर गुन्ह्यात फरार झालेल्या मध्यप्रदेशातील सेंधवा जिल्हा बडवाना येथील फरार आरोपी महेंद्र भगवान राठोड हा रावेर तालुक्यातील पाल परिसरात संशयित रित्या फिरत असताना रावेर पोलिसाना आढळून आल्याने त्याला पकडुन त्याची विचारपूस केली असता तो मध्यप्रदेशातील सेंधवा पोलिस स्टेशनचा फरार आरोपी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्याला रावेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील सेंधवा पोलिसांच्या ताब्यात दिले. तो फरार असल्याने सेंधवा पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर विभागाच्या पोलिस निरीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यामध्ये रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोउपनी तुषार पाटील, पो ह ईश्वर चव्हाण, पो शि महेश मोगरे, प्रमोद पाटील, महिला पोलीस शिपाई माधुरी सोनवणे यांनी केली.