आठ महिन्यांच्या लेकिवर झोपेच्या गोळ्या देऊन बापानेच केला अत्याचार, यावल तालुक्यातील धक्कादायक घटना
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यात एक अत्यंत घृणास्पद तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली. बापानेच आपल्या स्वतःच्या पोटच्या आठ महिन्यांच्या चिमुकली वर झोपेच्या गोळ्या देऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात बाप – लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका व्यक्तीचे सन २०२३ च्या जानेवारी मध्ये लग्न झाले असून त्याला आठ महिन्यांची मुलगी आहे. संबंधीत व्यक्ती हा आपल्या आठ महिन्यांच्या चिमुकली सोबत अश्लील कृत्य करीत होता. हा प्रकार त्याच्या पत्नीच्या लक्षात आला. परंतु तरीही या माथेफिरू पतीने एके दिवशी वेळ साधत आपल्याच आठ महिन्यांच्या चिमुकलीस झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनं मोठी खळबळ उडाली.
सदरची घटना लक्षात आल्याने पत्नीने पोलिस स्टेशनला पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.