भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

दोन चीमुकल्यांवर अत्याचार, बदलापूर रेल्वे स्टेशनवर रस्ता रोको,आरोपीला फसी द्या – संतप्त आंदोलकांची मागणी

बदलापूर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. यानंतर संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. तर पालकांकडूनही शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. शाळा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली. तसेच संस्था चालक, शिक्षकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.तसेच संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली आहे.

तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनाने तीन जणांवर कारवाई केली आहे. शाळेच्या संचालक मंडळाने याप्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे. तसेच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या २ सेविकांनाही कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. तसेच तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बदलापूर पूर्वेकडील पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी केल्याचा आरोप करत बदली केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण संस्थेने एक चौकशी समिती नेमली आहे.

ठाणे जिह्यातील बदलापूर येथील एका शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन बालिकांवर शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आला. गेल्या चार तासांपासून बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन सुरू आहे. संतप्त आंदोलकांनी आरोपीला फसी द्या अशी मागणी केली,आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशीही मागणी करण्यात आली. बदलापूर बस स्थानक परिसरातही आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलकांची गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, त्याला प्रतिउत्तर म्हणून आंदोलकांची पोलिसांवर दगड फेक करण्यात आली.

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला.१२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणानतंर पीडित मुलीच्या कुटुंबाने १६ ऑगस्ट रोजी दुपारी व १२;वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली.

दरम्यान,  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून SIT स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बदलापूर बाल अत्याचाराचे  दिल्लीत पडसाद उमटले असून राष्ट्रीय बाल हक्क आयोगा कडून  या प्रकरणाची दखल घेतली गेली आहे.आंदोलनाने  मुंबई कडे जाणारी व मुंबई हून येणारी रेल्वे सेवा बंद पडली.आंदोलक रेल्वे रुळावर जाऊन बसले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!