जिल्हा उपनिबंधकाला सहा लाख रुपये लाच स्वीकारताना एसीबी ने केली अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यातील तक्रारदार पुरुष, वय 46 वर्ष. रा. मंगरूळपीर. यांचे प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी दिग्विजय राठोड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांनी 9,00,000/-रुपये लाचीची मागणी करून यापूर्वी तक्रारदार यांचे कडून 2,50,000/- रुपये स्वीकारले आहेत व उर्वरित 6,50,000/- लाचेसाठी तक्रारदार यांना तकादा लावून मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 4/06/2024 रोजी अँटी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रार दिल्याने नमूद तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 06/06/ 2024 रोजी पडताळणी कारवाई केली असता आरोपी दिग्विजय राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदारास 6,00,000/-रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून सिल्वर अपार्टमेंट तिरुपती सिटी. वाशिम येथे सापळा कारवाईत लाच रक्कम 6,00,000/- रुपये स्वीकारल्याने दिग्विजय हेमनाथ राठोड वय 54 वर्ष पद जिल्हा उपनिबंधक वर्ग -1 सहकारी संस्था वाशिम राहणार साई विहार रेसिडेन्सी पाषाण सुस रोड पुणे 21 ह. मु. सिल्वर अपार्टमेंट तिरुपती सिटी फ्लॅट नंबर 506 वाशिम. याना ताब्यात घेऊन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सापळा अधिकारी, सचिन सावंत. पोलीस निरीक्षक लाप्रवि अकोला. नरेंद्र खैरनार पोलिस अंमलदार. दिगंबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकार ला प्र वी अकोला.