क्राईमधुळे

पाच हजारांची लाच घेताना कृषी विस्तार अधिकाऱ्याला एसीबी ने रंगेहाथ पकडले

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृषी विस्तार अधिकारी योगेश शांताराम पाटील , वय ४६ वर्षे, व्यवसाय – नोकरी , कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर,जिल्हा- धुळे. याला धुळे एसीबी ने रंगेहाथ पकडुन अटक केली.

तक्रारदार यांच्या आईच्या नांवे सांगवी वनक्षेत्रात वन जमीन असुन तकारदार यांनी आईच्या नांवे सदर वन जमीनीवर सिंचन विहीर खोदण्यासाठी सन २०२३-२०२८ मध्ये विरसा मुंडा कृषि कांती योजने अंतर्गत ४,००,०००/- रु शासकीय भुनदान मंजुर होण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह दि.२०.०४.२०२२ रोजी ऑनलाईन अर्ज करुन त्यानुसार त्यांना सदर योजनेअंतर्गत विहीर खोदण्याकरीता ४,००,०००/- रु शासकीय अनदान मंजुर झाले होते.

कृषी विस्तार अधिकारी योगेश शांताराम पाटील यांनी सिंचन विहीरीच्या जागेची स्थळ पाहणी करुन तक्रारदार व त्यांच्या आईचा फोटो काढून नेला होता व लाईन आउट करण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी योगेश शांताराम पाटील. यांनी तक्रारदार यांच्याकडे ५,०००/- रु मागणी करून सदर लाचेची रक्कम मौजे बोराड, ता. शिरपुर येथील स्टेट बँके समोर स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द शिरपुर तालुका पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये योगेश शांताराम पाटील , वय ४६ वर्षे, व्यवसाय – नोकरी , कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर,जिल्हा- धुळे. यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून त्यांच्या अंगझडतीत अंगझडतीत एक पाकीट मिळाले असुन पाकीटात २३५०/- रु व एसबीआय चे एटीएम कार्ड आहे. मिळाले असून आरोपीताची घरझडती सुरु आहे.

सदर कारवाई सापळा अधिकारी पंकज शिंदे ,पोलीस निरीक्षक ,लाप्रवि धुळे, सापळा पर्यवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि,धुळे. पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पो हवा/ राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पो.कॉ.रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर.यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!