भुसावळ-बोईसर एसटी २० फूट दरीत कोसळली; १५-२० प्रवाशी गंभीर जखमी
पालघर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : भुसावळ ते बोईसर रातराणी बसचा पालघरमधील वाघोबा खिंडीच्या परिसरात एसटी बसचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. दरम्यान ही एसटी बस २० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत एसटीमधील १५-२० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
- सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, कोणत्या देशाने केले फर्मान
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर तालुक्यात जोरदार प्रतिसाद,जावळेंना निवडून आणण्याचा मतदारांचा निर्धार
- रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
पालघर परिसरात एसटी महामंडळाकडून रातराणी या बसेसच्या फेऱ्या सुरु असतात. भुसावळ ते बोईसर या एसटीचा वाघोबा खिंडीत पहाटे सहा वाजता अपघात झाला. अपघात घडला त्यावेळी चालक मंद्यधुंद अवस्थेत होता. प्रवाशांनी यावेळी चालकावर आक्षेप घेतला, त्यांनी एसटीच्या कंडक्टरलाही तक्रार केली, मात्र तरीही चालक एसटी सुसाट चालवत होता. मात्र कंडक्टरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळेच हा भीषण अपघात झाल्याचे प्रवाशांचे मत आहे. यावेळी त्याचे एसटी बसवरील नियमंत्रण सुटले आणि एसटी थेट २० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत आत्तापर्यंत कोणी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच जखमींना तात्काळ बस मधून बाहेर काढत पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान प्रवाशांच्या या दाव्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. जखमींवर सध्या पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.