भुसावळ कडून इंदूर कडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलला अपघात
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ कडून इंदूर येथे जाणारी शाईन ट्रॅव्हल क्रमांक MP. 37. P. 9090 ही ५० प्रवाशांनी भरलेली गाडी फैजपूर येथून जवळच असलेल्या आमोद्या जवळील वळणावर ब्रेक न लागल्याने शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात ४ ते ५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून यांना फैजपूर येथील डॉ खाचणे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवार २४ मे रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली.
भुसावल कडून ही शाईन ट्रॅव्हल इंदूर येथे सुमारे ५० च्या वर प्रवासी घेऊन जात असताना यावल तालुक्यातील आमोदा गावाच्या पुढील वळणावर पाऊस सुरू असल्याने वळण लक्षात न आल्याने अचानक ब्रेक न लागल्याने सरळ शेतात जाऊन उजव्या साईडने पलटी झाली. आमोदा येथील ग्रामस्थांच्या मदतीने फैजपूर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दाखल केले.