भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर बसला अपघात, दहा प्रवाशी जखमी, दोन गंभीर

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर आगाराची बस जामनेर येथून मुक्ताईनगर कडे येत असता सारोळा फाट्याजवळ बस ने झाडाला धडक दिल्याने अपघात होऊन यात दहा प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सारोळा फाट्याजवळ एसटी परिवहन महामंडळाची मुक्ताईनगर आगाराची बस जामनेर हून मुक्ताईनगर येथे येत असता बस ने एका झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात बस चा ड्रायव्हर व कंडक्टर सह दहा प्रवासी जखमी झाले असून यात दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील दोघांना जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!