अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तिरुपतीचे लाडू…पुजारी आचार्य सत्येंद्र दास
अयोध्या, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिरातील लाडूंच्या भेसळीवरून संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील टीडीपी सरकारने केला आहे. आणि त्या प्रसादाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पहविण्यात आले असता तपासणी अहवालही आला असून त्यात जनावरांची चरबी व फिश ऑईल सापडल्याचे उघड झाले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी लाडूंमध्ये निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरण्यास परवानगी दिल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशभरात ‘फ्री टेम्पल मूव्हमेंटची’ म्हणजेच मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी, गुजरात मधील प्रयोगशाळेच्या अहवालाचा हवाला देऊन, तुपात “बीफ टॉलो”, “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि माशाचे तेल असल्याचा दावा केला. जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदावर असताना लाडूंमध्ये निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरण्यास परवानगी दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुपती मंदिरातील प्रसाद अयोध्या राम मंदिरात वाटण्यात आला होता अशी माहिती अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली. असल्याचं म्हटल आहे.
२०२४ जानेवारी महिन्यात अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्या सोहळ्यात तिरुपती मंदिरातून आलेला ३०० किलोंचा प्रसाद भक्तांना वाटण्यात आला होता यालाही मुख्य पुजाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. शुक्रवार रोजी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरण्यात येत असल्याच्या आरोपांनंतर संताप व्यक्त केला आहे. जर प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळण्यात आली असेल तर हे माफी योग्य नाही. “वैष्णव संत आणि भक्त कांदा आणि लसूणही वापरत नाहीत. अशा स्थितीत जर प्रसादात प्राण्यांची चरबी वापरण्यात येत असेल तर ते फार दुर्दैवी आहे. हा हिंदू धर्माचा मोठा अपमान आहे,” यामध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे,” या प्रकरणाचा तपास करावा अशीही मागणी या वेळी पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी केली आहे.
तसेच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी २०१९ ते २०२४ दरम्यान मुख्यमंत्री असताना जेव्हा जेव्हा दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तेव्हा त्यांनी तिरूपतीचे लाडू भेट दिले असल्याचेही बाहेर आले