भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मंदाकिनी खडसेंवरील कारवाई आकस बुद्धीने– छगन भुजबळांचा फडणवीसांवर निशाण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मंडे टू मंडे वृत्तसेवा : केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यांचीही चौकशी होणार आहे. खडसे यांच्यावर आकस बुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा डाव त्यांच्यावरच उलटेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम करत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यांचीही चौकशी होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदाकिनी खडसे यांच्यावर आकस बुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व यंत्रणांचा अतिरेकी वापर सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा डाव त्यांच्यावरच उलटेल, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, भाजप यंत्रणांच्या बळावर सरकार बनवू शकत नाही, असं सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यापूर्वी मीडियाशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!