“त्या” राज्य उत्पादन शुल्क पथकावरील कारवाई गुलदस्त्यात, लाखो रुपये वसुली करून गेलेल्या पथकाची वरिष्ठांशी सेटलमेंट?
सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| नुकतेच गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे भरारी पथक भुसावल विभागासह जिल्ह्यात येऊन गेले. विभागातील देशी, विदेशी, वाईन शॉप,परमिट रूम बियरबार, ढाबे, हॉटेल ला तपासणीच्या नावाखाली लाखो रुपये गोळा केले. यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या बाबत तक्रारी झाल्या, वृत्त प्रसिद्ध झाले.परंतु त्या भरारी पथक/ वसुली पथकावर काय कारवाई झाली? झाली की नाही,हा संपूर्ण विषयचं गुलदस्त्यात आहे. या बाबत कुठलाही तपशील मिळू शकला नाही. या भरारी पथकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सेटलमेंट तर झाली नाही ना?
नाशिक येथून आयुक्तांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक एम एच १५ नंबरची नाशिकची गाडी दोन ते तीन दिवस तपासणी च्या नावाखाली येऊन गेले .संपूर्ण भुसावळ विभागात रावेर, सावदा, फैजपूर,यावल, भुसावळ मुक्ताईनगर आदी परिसरातील सर्व देशी, विदेशी, वाईन शॉप, परमिट रूम बियरबार ,इतकेच नव्हे तर ढाबे ,हॉटेल ची त्यांनी तपासणी केली. या तपासणीत त्यांनी कारवाईचा बडगा दाखवत काहीं कडून ६० हजार, ५० हजार ३० हजार २५ हजार रुपये अशा मोठमोठ्या रक्कमा भरारी पथक वसूल करून पसार झाले .इतकेच नाही तर ढाबे, हॉटेल यांच्या कडूनही रुपये ऊकळले. असे लखो रूपये या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उकळले.
या भरारी पथकावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती काय? भरारी पथक हे कारवाईचा बाळगा उगारून केवळ वसुली करण्यासाठीच आले होते का? परंतु यांचेवर वरिष्ठांकडून काय कारवाई झाली हे मात्र बाहेर आले नाही. या बाबत उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. नाशिक आयुक्तांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक जळगाव जिल्ह्यातून लाखो रुपये वसुली करून गेले त्यांच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेटलमेन्ट तर केली नाही ना? अशी चर्चा सर्व प्रकारच्या मद्य विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.