चारही पाय दोरीने घट्ट बांधुन निर्दयीपणे उंट कोंबून नेणाऱ्या वाहनावर कारवाई
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नाकाबंदी दरम्यान खरगोनकडुन पाल कडे येणारी आयशर वाहन क्रमांक चझ-४१, क – ५०७२ हिची तपासणी केली असता त्यात २,००,०००/- रुपये किंमतीचे भारतीय वंशाचे १० उंट यांना अत्यंत निर्दयतेने चारही पाय दोरीने घट्ट बांधुन त्यांना कुठल्याही चा-या पाण्याची सोय न करता वाहनात पुरेशीजागी न ठेवता कोंबुन जखडून बांधुन ठेवलेल्या अवस्थेत वाहतुक करीत असतांना मिळुन आले.
रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र शेरी नाका पोलीस चौकी येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान ही घटना उघडकीस आली.
रावेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २५०/२०२४ प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम ११ चे (१), (घ), (ङ), (च), (ज), प्राण्याचे वाहतुक अधिनियम ४७,४८,४९ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ११९ प्रमाणे आरोपी नामे १) इस्माईल शहा सलीम शहा, वय २२ वर्ष, रा. भवराला, तह. सोनकंच, जि. देवास (म.प्र.), २) जाफर हुसेन आलम साहब, वय ४० वर्ष, रा. बडी दर्गा के पास कळपा, ता. जि. कळपा यांचे विरुध्द गुन्हादाखल करुन सदर वाहनातील उंट हे आर. सी. बाफना अनुसंधान, गोशाळा कुसुंबा जळगांव येथे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर कारवाई पोउपनिरी सचिन बाळासाहेब नवले, पोलीस अंमलदार जगदिश लिलाधर पाटील, मुकेश आनंदा मेढे, प्रदिप सुकदेव सपकाळे यांनी करुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार विष्णु लक्ष्मण भिल हे करीत आहेत. आरोपीतांना अटक करण्यात आली आहे