भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुक्यात गुटखा तस्करावर कारवाई, मुद्देमालासह ३ लाखांचा गुटखा जप्त

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात प्रतिबंधित व आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणारे वाहनावर पोलिसांनी कारवाई करत वाहनासह सुमारे ३ लाख १३ हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेश – बऱ्हाणपूर कडून येणाऱ्या टाटा मॅजीक क्रमांक एमपी- ६८, टी-०२२७ या वाहनाची रावेर येथील रुची मोटर जवळ तपासणी केली. यामध्ये त्यांना ७ गोण्यांमध्ये १ लाख १२ हजार ८०० रुपयांचा पान मसाला व तंबाखुयुक्त गुटखा मिळून आला. पोलीसांनी २ लाख रुपये कीमतीची टाटा मॅझीक गाडी असे ३ लाख १२ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला . गुटखा राज्यात प्रतिबंधित असतांना गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालक नदिमखान ईस्माईलखान. वय ३५, रा. कोतवाल वाडा. रावेर. याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई रावेर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल. पोहेकॉ सचिन घुगे, प्रमोद पाटील, समाधान ठाकुर, विशाल पाटील, संभाजी बिजागरे यांनी केली.रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा मध्यप्रदेशातून आणून रावेर,यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील परिसरात तस्करी केली जातं आहे.त्यांना संबंधित खात्यांकडूनच आर्थिक लाभा पोटी अभय दिले जाते

रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा मध्यप्रदेशातून आणून रावेर,यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील परिसरात तस्करी केली जातं आहे.त्यांना संबंधित खात्यांकडूनच आर्थिक लाभा पोटी अभय दिले जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!