भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात अवैध गुटख्यावर कारवाई, गोदामातून लाखोंचा गुटखा जप्त

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील एका गोदामातून राज्यात बंदी असलेला १ लाख ६५ हजार ९७६ रूपयांचा अवैध गुटखा यावल पोलिसांनी जप्त केला . तालुक्यातील साकळी गावातील गोदामावर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन शनिवार रोजी कारवाई करत एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकळी येथील भोनक  नदीच्या काठावर चिंटू वाणी याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गोदामावर छापा टाकला असता या गोदामातून आरोग्यास अपायकारक असलेला राज्यात प्रतिबंधित १ लाख ६५ हजार ९७६ रूपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून
सदरची कारवाई पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौरदार अस्लम खान, सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, योगेश गोसावी, पोलीस नाईक मोहसीन खान, अनिल साळुंखे, अरशद गवळी, मुकेश पाटील, राजेंद्र पाटील या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!