खाजगी वाहनावर “महाराष्ट्र शासन” नावाने पाटी, स्टिकर,बोधचिन्ह लावलेल्या वाहनांवर कारवाई होणार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अनेक शासन संबंधित आपल्या खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाच्या नावाचा बोर्ड अथवा स्टिकर लाऊन गाड्या फिरवतात. आता महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहून व आतील भागात महाराष्ट्र शासन, नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
ज्या खाजगी वाहनांवर किंवा वाहनात महाराष्ट्र शासन नाव, लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टीकर चिकटवून अथवा बोध चिन्हाचा वापर करून वाहने रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास अशा वाहनांवर मोटार वाहन अधिनियन व त्याअंतर्गत नियमानुसार कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.