पाय घासरून विहिरीत पडल्याने प्रौढाचा मृत्यू, यावल तालुक्यातील घटना
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील दिलीप सुकलाल मराठे या प्रौढाचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी रात्री घडली. मृत्यू झालेला प्रौढ हा साकळी येथील असून शिरसाड शेत शिवारात ही घटना घडली.
यावल तालुक्यातील साकळी येथील रहिवासी दिलीप सुकलाल मराठे (वय ५५) हे शिरसाड शिवारातील एका शेतातील विहिरी जवळ गेले असता त्यांचा पाय घसरला अन् ते विहिरीत कोसळले. हा प्रकार पहणाऱ्यानी तातडीने धाव घेत विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विहिरीत त्यांचा शोध घेण्यात आला. शेवटी मध्यरात्री ३ वाजता त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत्यू घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात नीलेश एकनाथ मराठे यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.