क्राईमयावल

विहिरीत पाय घसरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू, यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेत शिवारात बकऱ्यांसाठी चारा घेण्यासाठी गेला असता विहिरीत काठावरून पाय घसरून पडल्याने गोपाल पूनमचंद धोबी, वय ४५ वर्ष प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी संध्याकाळी यावल तालुक्यातील साकळी या गावी घडली.

यावल तालुक्यातील साकळी येथील गोपाल धोबी हा इसम मंगळवारी संध्याकाळी शिरसाड या गावाजवळील शेत शिवारातील शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यासाठी गेला असता सुधाकर रामकृष्ण चित्रे यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा पाय घसरून विहिरीत कोसळला. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांना विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!