ॲड. रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी निवड !
मुंबई/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज
दि 29 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी यांनी ॲड.रोहिणी खडसे यांना महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मावळत्या महीला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आ.नवाब मलिक, आ.बाळासाहेब पाटिल आ शशिकांत शिंदे. हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते
ॲड.रोहिणी खडसे या माजी मंत्री आ .एकनाथराव खडसे यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित आहेत त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली असुन त्यांचें पदव्युत्तर शिक्षण वकिली क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून एल एल बी, तर पुणे विद्यापीठातून एल. एल. एम पर्यंत झालेले आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी आ. एकनाथराव खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शिक्षण व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहेत त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा मध्य बँक ऑडिट मध्ये ” ड” दर्जा वरून” अ” दर्जामध्ये आली होती त्यांच्या कार्यकाळात बँकेचे संगणकीकरण, ए टी एम , सी बी एस प्रणाली सेवा सुरू झाली होती तसेच बँकेच्या ठेवी मध्ये आणि भाग भांडवलामध्ये वाढ झाली होती
त्यांच्या कार्यकाळात बँकेने आघाडी घेऊन विविध क्षेत्रात पुरस्कार मिळवले होते याशिवायमुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा असून त्यांनी आ.एकनाथराव खडसे यांनी स्थापना केलेली परंतु काही कारणाने अपूर्णावस्थेत असलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महीला व युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या ॲड.रोहिणी खडसे उपाध्यक्ष आहेत याचबरोबर त्या मुक्ताईनगर परिसरातील प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगरच्या अध्यक्षा आहेत यासंस्थे अंतर्गत बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या ॲड. रोहिणी खडसे कार्याध्यक्ष आहेत अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळाच्या माजी सदस्या असून अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा जळगावच्या ॲड. रोहिणी खडसे अध्यक्षा म्हणुन काम पाहत आहेत
मुक्ताईनगर परीसरात सामजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असतो भारतीय जनता पक्षात असताना त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्या साठी रोहिणी खडसे मेहनत घेत आहेत त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली होती यात्रे दरम्यान त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील 182 गाव वस्त्या पाड्यांवर जाऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न केला शिवाय पक्षाची सदस्य नोंदणी केली कापुस, केळी कांदा व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेला जनआक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला होता याशिवाय पक्षाचे विविध आंदोलने उपक्रमामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो त्यांचे पक्ष कार्य आणि संघटन कौशल्य बघुन पक्षाने त्यांना महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा