ॲड. रोहिणी खडसे यांनी स्वीकारला महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे यांची
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार , महीला आघाडी मावळत्या अध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी काल ॲड.रोहिणी खडसे यांना प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नियुक्तीचे पत्र दिले. आज दि 30रोजी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला त्यापुर्वी त्यांनी राष्ट्रिय अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्या सारख्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्तीवर विश्वासाने महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली पक्ष नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल पक्ष संघटन वाढीसाठी मेहनत घेऊन आ शरद पवार साहेब यांचे आणि पक्षाचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेल तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी पक्षाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले