मुक्ताईनगर मध्ये ॲड. रोहिणी खडसे व आ.चंद्रकांत पाटील यांच्यात खरी लढत
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात मुक्ताईनगर सह रावेर तालुक्यातील ४२ गावे व बोदवड तालुका हा प्रमुख भाग येत असून या विधानसभा मतदारसंघात यंदा प्रमुख लढत महाविकास आघाडीच्या ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे व महायुतीचे उमेदवार आ. चंद्रकांत निंबा पाटील यांच्यात खरी लढत होत आहे.
मागील निवडणुकीत मुक्ताईनगर मतदार संघात अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा, व काग्रेसाचा पाठिंबा होता. चंद्रकांत पाटील यांना ९१,०९२ मते मिळाली होती, तर रोहिणी खडसे यांना ८९,१३५ मते मिळाली होती. १९५७ मतांनी रोहिणी खडसे यांना पराभव पत्करावा लागला होता.
यंदा ॲड. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश महिलाअध्यक्ष आहेत व या महविकास आघाडी कडून निवडणूक लढवित आहेत. तर चंद्रकांत पाटील यांना शिवसेना शिंदे गट यांच्याकडून तिकीट मिळाले असून ते महायुतीचे उमेदवार आहेत. याच्या सह एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मुक्ताईनगर मतदार संघात एकूण ३ लाख ३५ हजार ३७४ मतदार असून पुरुष १ लाख ७२ हजार २३२, महिला १ लाख ६३ हजार ४१ तर १ तृतीयपंथी मतदार आहे. मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. माजी मंत्री एकनाथ खडसे हे प्रभावशाली नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे आहेत. त्यांचे भाजपामध्ये काही जुने मित्र आहेत. त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.