भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

ऐनपुर परीसरातील नुकसानग्रस्त भागाची माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कडुन पाहणी

Monday To Monday NewsNetwork।

ऐनपुर. ता. रावेर(प्रतिनिधी)। काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी मंत्री तथा लोकनेते मा.एकनाथराव खडसे यांनी ऐनपुर सह परिसरातील विटवा , निंबोल ,सुलवाडी, कोळदा ,धामोडी ,रेंभोटा-वाघाडी शिवार येथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधत केळी पिकाचे झालेले नुकसान बघता पीक विम्याच्या अटी शिथिल करण्यात याव्यात तसेच पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन केळी पिकाचे झालेले नुकसान प्रत्यक्ष बघावे म्हणजे नुकसान सुस्पष्टपणे दिसेल .

लवकर नुकसानभरपाई मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री ह्यांची भेट घेऊन कोकणात तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मिळाली तशी त्वरित मदत मिळावी अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.तसेच “पी एम एफ बी वाय”गव्हर्नमेंट वेबसाईटवरून सीएससी सेंटरमध्ये जाऊन आपल्या बागेचा नुकसानग्रस्त फोटो सादर करून नुकसानीचा अर्ज करता येतो अशी माहिती सुद्धा यांच्या कडुन मिळाली नाथाभाऊंच्या ह्या नुकसान पाहणी दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी माजी आमदार अरुणदादा पाटील,माजी जि.प. सदस्य रमेश नगराज पाटील , योगेश कोलते सर ,तसेच परिसरातील सरपंच तसेच नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!