ऐनपुर स्वस्तधान्य दुकानदाराकड़ून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; सोशल डिस्टनचा फज्जा
Monday To Monday NewsNetwork।
ऐनपुर. ता. रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील स्वस्त धान्य रेशन दुकान क्रमांक 64 येथे में महिन्याचे शासनाकडुन आलेले मोफत धान्य वाटप केले जात आहे,परन्तु धान्य वाटप करत असतांना स्वस्त धान्य दुकान क्रमांक 64 येथे दुकानदाराकडुन शासनाने ठरवून दिलेले ब्रेक द चैन अंतर्गत चे सर्व नियम धाब्यावर ठेवण्यात आले आहे,सदरील स्वस्त धान्य दुकानावर सोशल डिस्टनच्या नियमांचे पालन केले जात नसून नियमांचे उल्लंघन होत आहे शिवाय लाभार्थ्यांची अशी गर्दी बघून वाटपाचे नियोजन सुदधा दुकानदाराकड़ून होत नसल्याचे दिसून येते दुकानदाराला धान्य वाटप करत असतांना कोणत्याही शासकीय नियमांचे भान राहिलेले नाही
तसेच स्वस्त धान्य दुकान क्र.64 येथे शासकीय नियमानुसार लाभार्थ्यांच्या सोईसाठी स्वस्त धान्य रेशन दुकानाच्या दर्शनी भागात दुकानाचे नाव आणि विक्रीदर असलेले फलक लावलेले दिसून येत नाही,धान्य दरपत्रक,कोणत्या लाभार्थ्याला किती धान्य,महिन्याचे वाटप धान्य,शिल्लक धान्य या बाबतीत कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाही.जर असेच शासकीय नियमांचे उल्लंघन या रेशन दुकानदाराकडुन होत असेल तर अन्न व पुरवठा अधिकारी गेले कुठे?यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? स्वस्त धान्य दुकानावर स्थानिक दक्षता समिति नियुक्त केलेली नाही का? स्थानिक दक्षता समिति याकडे लक्ष देणार का? व अशा या हलगर्जी पणामुळे कोरोना सारख्या भयंकर रोगाचा प्रसार झाला तर याचे जबाबदार कोण?असे अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.