केस गळती नंतर आता नख गळती, नागरिकात भीतीचं वातावरण
केस गळती “सेलेनियम” मुळे?
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |अचानक केस गळतीन नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले असताना केस गळती प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलेलं दिसतंय. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील असून केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. नखं गळती या धक्कादायक प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात गेल्या डिसेंबर महिन्यापासून अचानक केस गळतीने परिसरातील नागरिक हैराण झालेले असताना केस गळती झालेल्या रुग्णांची नखे आता अचानक विद्रूप होऊन कमजोर होऊ लागली आहेत तर काहींची नखे गळून पडली असल्याची माहिती समोर आली आहे.
अचानक केस गळती सुरू झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील
नागरिक दहशती खाली आहेत. त्यातच आता नख गळती सुरू झाल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी करण्यात आली. ICMR चे पथक आले. रक्ताचे नमुने अनेक वेळा घेतले गेले. मात्र, यावर औषध उपचार काहीच केले नसल्याचा आरोप
नागरिक करत आहेत. अद्यापही ICMR चा अहवाल अद्यापही जाहीर केलेला करण्यात आलेला नसल्याने नागरिकांच्या मनात अनेक शंकाकुशंका निर्माण होत असून हा नक्की कोणता आजार आहे या बद्दल नागरिक संभ्रमात आहेत.
बुलढाणा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बनकर यांनी या बाबत सांगितलं की, चार गावां मधील २९ रुग्णांची नखांची समस्या असून त्याची नखे गळत असल्याच आढळून आले.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे पाठविण्यात आले आहे. हा सर्व प्रकार सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज असून जे केस गळतीचे रुग्ण आहेत त्यांच्या मधेच सध्या नखं गळतीची समस्या जाणवत आसल्याचे बुलढाणा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बनकर यांनी या बाबत सांगितलं.
.