क्राईमचाळीसगाव

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या  करून अपघाताने मृत्य झाल्याचा बनाव, मृतदेह महामार्गावर आणून टाकला. पत्नी व दिरास अटक

चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचीब निर्घृण हत्या  करून अपघाताने मृत्य झाल्याचा बनाव करत मृतदेह महामार्गावर आणून टाकल्याची खळबळ जनक घाटना चाळीसगाव येथे उघडकीस आली. महिलेचे चुलत दीरासोबत अनैतिक संबंध होते. पती हा अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव शिवारातील महामार्गावर मंगळवारी १८ जून रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. पत्नीने आधी ब्लेडने पोटावर वार केले. त्यानंतर प्रियकर चुलत दीर याने ३० किलो वजनाचा दगड डोक्यात टाकून ठार केले. कुणाला संशय येवू नये म्हणून मृतदेह महामार्गावर आणून टाकला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळू सीताराम पवार. रा. गवळीवाडा, न्यायडोगंरी, ता. नादंगाव, जि. नाशिक. हा आपल्या पत्नी वंदना बाळू पवार यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथे वास्तव्याला होता. बाळू पवार हा नेहमी दारूच्या नशेत येवून पत्नी वंदना पवार हिला मारहाण करत होता. दरम्यानच्या कालावधीत विवाहितेचे तिचा चुलत दीर गजानन राजेंद्र पवार यांच्यासोबत प्रेम संबंध जुळून आले. गजानन आणि वंदना यांच्या प्रेम संबंधात बाळू पवार हा अडसर ठरत असल्याचे बघून दोघांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मंगळवारी १८ जून रोजी गजानन याने बाळू पवार याला खूप दारू पाजली. व दुचाकीवर बसवून रात्री १०.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव शिवारातील महामार्गावर येथे आणले. त्याठिकाणी पत्नी वंदना हिने पती बाळू पवार यांच्यावर ब्लेडने पोटावर वार केले. तर गजानन याने बाजूला पडलेला ३० किलो वजनाचा दगड उचलून बाळूच्या डोक्यात टाकून त्याचा निर्घृण मृत्यू झाला. . त्यानंतर दोघांना पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर आणून टाकला. कुणाला संशय येऊ नये म्हणून दोघांनी मिळून त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून त्याचा दारुच्या नशेत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्यानंतर दोघे पसार झाले.

चाळीसगाव शहर पोलीसांना सदरची घटनेची माहिती मिळाली असता त्यांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला. सुरूवातील चाळीसगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु बाळू पवार याच्या अंगावरील खुणांमुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा पोलिसांचा संशय आला. त्यानंतर पोलीसांनी मयत बाळूच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली. मयताची पत्नी वंदना हिच्याकडे फोनवरुन चौकशी केली असता तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर  चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातून वंदना व तिचा चुलत दीर गजानन या दोघांना संशयावरून ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चौकशी व तपासाअंती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!