उन्हाळ्या नंतर अखेर मुक्ताईनगरातील हँड पंप दुरुस्तीला नगरपंचायत प्रशासनास मुहूर्त गवसला
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज-प्रतिनिधी : शहरातील हॅन्डपॅम्प देखभाल दुरुस्ती अभावी गेल्या चार ते पाच महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत ऐन उन्हाळ्यातही नगरपंचायत प्रशासनाला दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळाला नाही “मंडे टू मंडे न्युज” ने याबाबत प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले यानंतर आता कोण्या जोतिषाकडून मुहूर्त मिळाल्याने हँड पंप दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे मुक्ताईनगर वासीयांकडुन बोलले जात आहे.
- १५ हजारांची लाच घेताना दोन पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, एकास अटक, एक फरार
- मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला,अखेर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री
- तब्बल ३५१५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, निवडणुक आयोग मालामाल, सर्वाधिक उमेदवार कोणाचे?
गेल्या चार ते पाच महिन्या पासून शहरातील काही हँड पंप देखभाल दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत होते याकडे नगरपंचायतीने सपशेल दुर्लक्ष करत भर उन्हाळा असताना एवढ्या रण रण त्या उन्हात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत होते नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासीयांना त्याचा त्रास मात्र सहन करावा लागला याबाबत मुक्ताईनगर वासियांचे पाण्यासाठी हाल होत असल्याचे वृत्त “मंडे टू मंडे न्युज” ने प्रसिद्ध केले या प्रकरणी वेळोवेळी नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले व शेवटी याला मुहूर्त गवसला असून हँड पंप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून यावेळी नगरपंचायत कर्मचारी भगवान वंजारी, गोलू पाटील उपस्थित होते.
मात्र, वासीयांचे गेल्या चार पाच महिन्याच्या पाण्यासाठीची वणवण करणे हे संबंधित विभागाच्या व एकंदरीत नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेचे मोठे उदाहरण यानिमित्ताने समोर आले असल्याचे शहरात बोलले जात आहे. हँड पंप दुरुस्ती करण्यात येत असल्याने मुक्ताईनगर वासियांनी “मंदे टू मंडे न्युज” चे आभार मानले आहे.