ब्रेकिंग : तिरुपती नंतर आता सिद्धिविनायक मंदिराचे प्रसादाचे लाडू चर्चेत, महाप्रसादात उंदीर
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्या देशभरात तिरूपती बालाजीचा प्रसादाचा मुद्दा गाजत असताना प्रसादात दिला जाणारा लाडू हा सध्या संपूर्ण देशात वादाचा विषय बनला आहे. लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण मोठी चर्चेत असताना सिद्धिविनायक मंदिरात मिळाणारे प्रसादाचे लाडू उंदिर खात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.या प्रकाराने मोठी खळबळ माजली आहे.
सामान्य नागरिक ते सेलिब्रिटींची सिद्धविनायक गपणती मंदिरात रीघ लागलेली असते. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक येथे येतात.आणि प्रसाद म्हणून सिद्धिविनायक मंदिरात मिळणारा प्रसादाचा लाडू आवर्जून घरी घेऊन जातात. येथे मिळणारा लाडू देखील प्रसिद्ध आहे. मात्र हेच लाडू आता उंदिर खात आहेत. सिद्धिविनायक मंदिरात प्रसाद म्हणून देणाऱ्या लाडूच्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ले आढळली आहेत. तर मोठ्या प्रमाणत लाडूचे पॅकेट कुरतडून लाडू खाल्ले आहेत.चोख व्यवस्था असलेल्या सिद्धिविनायक मंदिर प्रशासन भाविकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप केला जात आहे.
उंदीर हे श्री गणेशाच वाहन, गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या याच उदरांनी सिद्धिविनायक मंदिरात हैदोस घातला आहे. हा हैदोस इतका की थेट प्रसादात उंदिर दिसू लागले आहेत. गर्भश्रीमंत असलेल्या मंदिरात कोणाचं याकडे लक्ष कसे नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
व्हिडिओमध्ये मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादाप्रमाणे पॅकिंग असलेली लाडवांची काही पाकिटं दिसत आहेत. यात काही उंदीर असल्याचं व्हिडिओत दिसतं. तसंच अनेक पाकिटंही कुरतडलेली आढळून आली आहेत.
भाविक कुठलीही मनात शंका न बाळगता मोठ्या श्रद्धेने देवाच्या चरणी माथा ठेवत प्रसाद खातात. परंतु पण अशा पद्धतीनेया घटनेने भाविकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सिद्धिविनायक मंदिर प्रशासन करत असल्याने भाविकांमध्ये मिठी नाराजी पसरली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे. या व्हिडिओची चौकशी करावी लागेल, असे मंदिर ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा