भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

गुजरातमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळला; 100 हून अधिक नागरिक पाण्यात

अहमदाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा । गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूल कोसळल्याने 100 हून अधिक जण पाण्यात कोसळल्याची भिती वर्तवली जात आहे. घटनास्थळी सुरक्षारक्षक दाखल झाले असून, त्यांनी शर्तीच्या प्रयत्नांनी बचाव कार्याला सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास 500 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. देशभरात सध्या छटपुजेचा उत्साह असून, छटपुजेनिमित्त मोठ्या संख्येने लोक या ब्रिजवर उपस्थित होते. या उत्साहादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरजण पडले आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या घटनेमुळे गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पूल कोसळल्यानंतर नेमके किती जण नदीत वाहून गेले याची माहिती अद्याप समजलेली नाही. या घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. नदीत वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. नदीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आली आहे.

मोरबी येथील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!